23.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रशिवजयंतीदिनी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार

शिवजयंतीदिनी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार

सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग््रयात लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने आग््रयाच्या किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

आग््रयाच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR