36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeधाराशिवधाराशिव शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

धाराशिव शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील सेंट्रल बिल्डींग ते बसस्थानक जाणा-या रस्त्यावर पायी चालत जाणा-या एका ६० वर्षीय व्यक्तीस एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात डॉ. गपाट यांच्या दवाखान्यासमोर झाला. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाणे येथे २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील रमाईनगर येथील मच्छिंद्र गोरोबा वाघमारे (वय ६०) हे दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सेंन्ट्रल बिल्डींग ते बसस्थानक जाणा-या रोडवरून पायी जात होते. ते डॉ. गपाट यांच्या दवाखान्यासमोर आले असता त्यांना एका अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. त्याने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून मच्छिंद्र वाघमारे यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये मच्छींद्र वाघमारे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुमन मच्छिंद्र वाघमारे यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-२७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), सह मोवाका कलम १३४, १८४ अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR