33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रफक्त कमळच डोक्यात, घड्याळ उसनवारीत..!

फक्त कमळच डोक्यात, घड्याळ उसनवारीत..!

अर्चना पाटलांचा व्हिडीओ शेअर करत रोहिणी खडसेंची टीका

मुंबई : प्रतिनिधी

धाराशिव मतदार संघाच्या अर्चना पाटील यांनी नुकतेच भाजपमधून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर लगेच त्यांना उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली. मात्र उमेदवारी जाहीर होताच फक्त तीन दिवसातच अर्चना पाटील या वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात त्या ‘मी कशाला राष्ट्रवादी वाढवू?’अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केलीय.

अर्चना पाटील या धाराशिव मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. या दरम्यान पत्रकारांनी त्यांना बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फारसे वर्चस्व नाही. फक्त आमदार राजेंद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. रोहिणी खडसे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. ‘टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात फक्त कमळच आहे डोक्यात, घड्याळ आहे उसनवारीत..!’ , असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे.

अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या
‘मी कशाला वाढवू? म्हणजे मला कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. माझी महायुतीची उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीच्या खासदारांचा आकडा ४०० पार जाण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत हे महायुतीचे घटक आहेत. माझा नवराच भाजपचे आमदार आहेत. मला इकडून निवडून देणार आहेत. मला राजेंद्र राऊत यांचा पाठिबा असल्याने कोणत्याही गटापेक्षा महायुती वाढणार आहे’, असे अर्चना पाटील म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR