31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुनगंटीवार यांच्या प्रचार रथाला गावात विरोध

मुनगंटीवार यांच्या प्रचार रथाला गावात विरोध

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावातून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचाररथ हाकलण्यात आला आहे. गावात या प्रचाररथाने प्रवेश करताच एका गावक-याने तो अडवला आणि आधी पंधरा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. बोगस विकास आम्हाला नको.

अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे घोटाळेबाज या पक्षात गेले आणि यांचा प्रचार आमच्या गावात करता का, असा प्रश्न या गावक-याने केला. चारशेचा गॅस सिलिंडर बाराशेवर नेऊन ठेवला. चला निघा इथून, असा दमही या गावक-याने दिला. सध्या हा व्हीडीओ समाज माध्यमावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ आर्णी तालुक्यातील खेडी (पुरुषोत्तम) येथील असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR