परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनाद्वारे युवकांमध्ये उद्योजकता विकास करण्यासाठी दि.४ ते ११ सप्टेंबर दरम्यान ८ दिवसीय बाल्य रेशीम कीटक संगोपन कार्यक्रम या विषयावर सशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थींना ८ दिवस राहण्याची व भोजनाची व्यवस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाच्या संधीचा नवीन तुती लागवड केलेल्या रेशीम उद्योजक शेतक-यांनी घ्यावा. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून जिल्हा रेशीम अधिकारी, केंद्रीय रेशीम मंडळ कार्यालयातील अधिकारी, विद्यापीठाचे रेशीम अधिकारी, कीटकशास्त्र विभागाचे तज्ञ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अधिका-यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी रेशीम संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक धनंजय मोहोड यांचाशी संपर्क साधून नोंदणी करावी असे विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी कळविले आहे.