30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयआमच्या नेत्यांकडे रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत

आमच्या नेत्यांकडे रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या बँक खात्यांवर कारवाई झाली असून काँग्रेसची खाती गोठवली आहेत. याबाबत आज काँग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. या निवडणुकीत आम्ही प्रचारही करु शकत नाही, आमचे नेते प्रवासही करु शकत नाहीत. रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अजय माकन उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, विना बँक खाते आम्ही निवडणूक कशी लढणार, जर तुमच बँक खाते बंद केले, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणार कसे? आम्ही ना प्रचार करु शकतो, ना प्रवास करु शकतो, ना नेत्यांना पैसा देऊ शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसला निवडणूक लढवू द्यायची नाही
निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेसच्या बँक खात्यावर कारवाई करणे म्हणजे काँग्रेसला निवडणूक लढवूच द्यायची नाही, एक महिन्यापूर्वी काँग्रेसची सर्व खाती फ्रीज केली आहेत. काँग्रेससोबतच अन्याय सुरू आहे. निवडणूक आयोग यावर शांत आहे. आम्हाला २० टक्के मतदान करतात, सर्व संस्थात्मक संघटना शांत आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.

देशात लोकशाही नाही
देशात लोकशाही आहे हे खोटे आहे, आमची बँक खाती गोठवली नाही तर लोकशाही गोठवली आहे. सात वर्षां आधी १४ लाखांचा मुद्दा आहे, १० हजार रुपयांचा दंड असायला हवा होता आज ते २०० कोटी वसूल करत आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR