40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइंटरनेट एकदम सुसाट, ९० चित्रपट डाऊनलोड करा १ मिनिटांत

इंटरनेट एकदम सुसाट, ९० चित्रपट डाऊनलोड करा १ मिनिटांत

शांघाय : चीनचा इंटरनेट क्षेत्रात दबदबा आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्याचा दावा चीन करत आहे. हे एक क्लाऊड ब्रॉडबँड आहे. ते रॉकेटच्या गतीने ग्राहकांना इंटरनेट सेवा देते. चीनच्या दाव्यानुसार, क्लाऊड ब्रॉडबँड तंत्रज्ञानाच्या मदतीने युझर्स एका मिनिटांमध्ये जवळपास ९० चित्रपट सहज डाऊनलोड करु शकतील. या इंटरनेट सेवेला एंहेस्ड ऑल-ऑप्टिकल नेटवर्क असे नाव देण्यात आले आहे. चीनच्या या नव तंत्रज्ञानामुळे इतर देशांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जगातील पहिल्या 10जी क्लाऊड ब्रॉड बँड कम्युनिटीची शांघायमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेला अर्थातच ‘50जी-पीओएन’चे पाठबळ आहे. चायना टेलिकॉम शांघाय कंपनी आणि यंगपू जिल्हा प्रशासनात या सेवेसाठी करार झाला आहे. यामध्ये लायटिंग फास्ट इंटरनेट स्पीड देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांचा डिजिटल अनुभव वृद्धींगत झाला आहे. त्यांना इंटरनेटचा खरा आनंद लुटता येत आहे.

यामध्ये युझर्सला १० गीगाबाईट क्लाऊड ब्रॉडबँडचा अनुभव मिळेल. चीनच्या अल्ट्रा फास्ट डेटा हस्तांतरण तंत्रज्ञानामुळे इतर अनेक नवसंशोधनाला बळ मिळेल. तर सध्या ज्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ज्यात स्मार्ट होम तंत्रज्ञानाचा वापर होतो, ते अद्ययावत होईल.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम डेटा प्रक्रिया, लॅग फ्री कम्युनिकेशनसह 10-जी नेटवर्क मिळेल. भारतातही 5-जी नेटवर्क नंतर सॅटेलाईट इंटरनेटची चर्चा सुरु आहे. पण चीनने मात्र आघाडी घेतली आहे. भारतात आता 6-जीची चर्चा रंगत आहे. पण त्याविषयी कोणतेही धोरण स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR