25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी तळ उध्वस्त केल्याचा दावा

पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी तळ उध्वस्त केल्याचा दावा

नवी दिल्ली : इराणनं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्त केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला.

पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्याबाबत इराण किंवा पाकिस्तानकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी इराणमध्ये राहून पाकिस्तानविरुद्ध कट रचतात आणि हल्ले करतात. इराण अशा संघटनांना आश्रय देऊन मदत करतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जेव्हा जेव्हा पाकिस्ताननं इराणवर असे आरोप केले आहेत, तेव्हा तेव्हा इराणनं नेहमीच पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR