रोम : पाकिस्तानचे बॉक्सर सध्या इटलीत ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यातीलच एका बॉक्सरने वेगळाच प्रताप केला. जोहैब राशीद नावाच्या बॉक्सरने आपल्या संघातील दुस-या खेळाडूचे पैसे चोरून पोबारा केला आहे. ही माहिती खुद्द पाकिस्तान अमॅच्युअर बॉक्ंिसग फेडरेशनने दिली.
फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, त्यांनी हा प्रकार इटलीतील पाकिस्तानी दूतावासाच्या निदर्शनास आणून दिला आणि या घटनेबाबत पोलिस अहवालही दाखल केला.
राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नासिर अहमद म्हणाले, जोहैब रशीद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाच सदस्यीय संघाचा एक भाग म्हणून तेथे गेला होता. मात्र घडलेला प्रकार हा बॉक्ंिसग फेडरेशन आणि देशासाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. जोहैबने गेल्या वर्षीच्या आशियाई बॉक्ंिसग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक ज्ािंकले होते आणि त्याला पाकिस्तानमधील एक उगवतीचा तारा म्हणून ओळखले जात होते.
नासिरने सांगितले की, महिला बॉक्सर लॉरा इकराम प्रशिक्षणासाठी बाहेर गेली होती आणि हॉटेलमधून गायब होण्यापूर्वी जोहैबने समोरच्या डेस्कवरून तिच्या खोलीच्या चाव्या घेतल्या आणि पर्समधून तिचे विदेशी चलन चोरले.