35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रविद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर

विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कर्मचा-यांनी आंदोलन पुकारले आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृति समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचा-यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचा-यांनी २८ आणि २९ फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता कर्मचा-यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारले आहे.

मागण्या मान्य न झाल्याने काम बंद आंदोलन
नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावॅटचे एकूण तीन संच आहेत. येथे रोज १९६० मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीजनिर्मितीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR