24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeराष्ट्रीयपाकिस्तानी सैनिकांनी केला बीएसएफच्या चौकीवर गोळीबार, एक जवान जखमी

पाकिस्तानी सैनिकांनी केला बीएसएफच्या चौकीवर गोळीबार, एक जवान जखमी

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री उशिरा युद्धविरामाचे उल्लंघन केले आणि जम्मू सीमेवर असलेल्या भारतीय चौक्यांवर कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला. ज्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला. यावर बीएसएफच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले मात्र यामुळे पाकिस्तानचे काही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.जम्मूच्या अखनूर भागात सीमेपलीकडून पाक सैनिकांनी हा गोळीबार केला.

या हल्ल्यानंतर लष्कर सध्या हाय अलर्टवर आहे. १० सप्टेंबर रोजी पहाटे २.३५ वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान ३,३२३ कि.मी. लांबीची सीमा आहे, त्यापैकी २२१ कि.मी. आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि ७४० कि.मी. जम्मू-काश्मीरमधील एलओसी आहे. या संदर्भात, बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे २.३५ च्या सुमारास अखनूर भागात सीमेपलीकडून बेकायदेशीर गोळीबार झाला, ज्याला बीएसएफने योग्य प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. आमचे सैनिक हाय अलर्टवर आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर कडक नजर ठेवत आहेत, असे ही प्रवक्तयांनी सांगितले.

२०२१ मध्ये केले युद्धविराम कराराचे नूतनीकरण
भारत आणि पाकिस्तानने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी युद्धविराम कराराचे नूतनीकरण केले होते आणि तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान अधूनमधून युद्धविराम उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR