रांची : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबी बवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. दरम्यान या योजेनेवरून विरोधकांनी सत्ताधा-यांवर टीकेची झोड उठवली तर महायुतीच्या नेत्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान आमचे सरकार जर परत आले तर या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करून आम्ही लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला २१०० रुपये जमा करून अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला २१०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्ये देखील अशीच योजना सुरू करण्यात आली आहे. जीचे नाव मंईयां सम्मान योजना असे आहे. हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री होताच या योजेतून मिळणा-या पैशांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता झारखंडमधील महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे येथील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या योजनेचं स्वागत होताना दिसत आहे.