26.7 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeपरभणीपरभणीत उस्ताद डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सव

परभणीत उस्ताद डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सव

परभणी (प्रतिनिधी)- परभणी येथे उद्या दि.२८ व २९ रोजी उस्ताद डॉ.गुलामरसूल संगीतसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.बसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हे दोनदिवसीय संगीत संमेलन संपन्न होणार आहे.संमेलनाचे हे सहावे वर्ष असून देवगीरी संगीत प्रतिष्ठान लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविते.

दि.२८रोजी सायं.६.३० वा.उद्घाटन होवुन सर्वप्रथम शिल्पा बीडकर सेवलीकर(ठाणे)यांचे गायन होईल. त्यानंतर संभाजीनगर येथील महागामी गुरुकूलच्या विद्यार्थीनींचे कथ्थक नृत्य होणार आहे. अकोला येथील गायक निरंजन लांडे यांचे गायनाने पहिल्या दिवसाच्या संमेलनाची सांगता होणार आहे. दि. २९रोजी “तालसंकिर्तन”हा तालवाद्याचा आगळावेगळा कार्यक्रम डॉ. प्रशात जोशी सादर करतील. सोहम मोहनपूरीकर, विशाल धानोरकर,संकेत शार्दुल, प्रद्युम्न जोशी, मयूर काकडे यांचा सहभाग राहणार आहे. मुंबई येथील संगीत मिश्रा यांचे सारंगी एकलवादन होईल.कोलकत्ता येथील सम्राट पंडीत यांच्या शिखरमैफलीने संमेलनाची सांगता होणार आहे. परभणीकर रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकांत उमरीकर, देवीदास अर्धापूरकर,मल्हारिका़ंत देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR