21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeराष्ट्रीयपन्नूच्या स्लीपर सेलशी संबंधित व्यक्तीला अटक

पन्नूच्या स्लीपर सेलशी संबंधित व्यक्तीला अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या स्लीपर सेलशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली आहे. जाविंदसिंग लाखी असे या व्यक्तीचे नाव आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्याच्या सांगण्यावरून तो दिल्लीत भारतविरोधी घोषणा लिहायचा. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या स्वीपर सेलशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, पन्नूच्या सांगण्यावरून तो दिल्लीत खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असे आणि भिंतींवर भारतविरोधी गोष्टी लिहीत असे.

पन्नूच्या सांगण्यावरून दिल्लीतील उत्तम नगर, टिळक नगर आणि निहाल विहारमधील भिंती आणि शाळांवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिल्या होत्या, अशी माहिती जाविंदसिंग लाखी याने पोलिसांना दिली. गुरपतवंत सिंग पन्नू हा फुटीरतावादी नेता असून तो अमेरिकेत राहून भारतात खलिस्तानची मागणी करतो. तो रोज भारतात हल्ल्याच्या धमक्या देत असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR