लातूर : सिद्धेश्वर दाताळ
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळी सारख्या सण उत्सवात दिसून येत असते. लक्ष्मी पूजनात आवर्जून स्थान असणा-या फड्यामुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. दीपावलीच्या खरेदीत आकाशकंदील, पणत्या, फटाके आणि कपडे यासोबतच फड्याचाही समावेश असतो. धनत्रयोदशीला खरेदी करुन लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा असल्याने आजही फड्याचे बाजारात आपले अस्तत्वि टिकवून आहे.
दिवाळीत म्हणजे लक्ष्मीपूजनाला फड्याची पूजा करण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा मोठया प्रमाणात पाळली जाते. पूजनासाठी फड्याला देखील सर्वाधिक मागणी असते. फड्याला लक्ष्मी माणून पूजा करण्याची जुनी प्रथा आहे. फड्याचे दर यंदा स्थिरावले असल्याचे किरकोळ विक्रेते सांगत आहेत. दिवाळी सण गुरुवारपासून वसुबारसने सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारबेठेत सर्वत्र खरेदीची लगबग दिसून येत आहे. अशाच लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असलेली फडा बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे.
आधुनिक काळातही नागरिक फडा खरेदीसाठी विशेष पसंती दाखवत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या फड्याला दिवाळीत पूजनासाठी महत्त्वाचे स्थान दिले जाते. परराज्यातील आयातमोळ नावाच्या गवतापासून किंवा श्ािंदीच्या झाडांच्या पानापासून फडा तयार केला जातो. राज्यात शिंदींची झाडे नष्ट झाली असून, श्ािंदीचे पान मध्य प्रदेशातील इंदूर, फतीयाबाद, चौरण येथून आयात केले जाते. शहरातील बाजारात फड्याची ७० रुपयात एक व १४० रुपयाला जोडी विकली जाते. तर आधुनिक झाडूची बाजारात किंमती १५० ते २०० रुपये इतकी असल्याचे किरकोळ विक्रित्या निशाबाई कांबळे, ललीता कांबळे, तूळाबाई कांबळे यांनी एकमतशी बोलताना सागीतल्या.
फडा तयार करणा-यांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. घरातील मोठा फडा ७० रुपये तर छोटा फडा ५० रुपये दराने शहरातील बाजारपेठेत विक्री होत आहे. देवघरासाठी लागणारा फडा २० ते ४० रुपयेप्रमाणे विक्री केली जात आहे. फडा तयार करण्यासाठी पन्हळी झडकून, चिरुन, नार काढून, मुट धरणे, अशा विविध प्रकारातून फडा तयार केला जातो.