31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीय१० हजार फुटांवर मतदान केंद्र

१० हजार फुटांवर मतदान केंद्र

श्रीनगर : पृथ्वीवरील चंद्राची उपमा असलेला लडाख लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्साहाने सज्ज झाला आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विविध प्रयत्न केले आहेत. लेह जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे १० हजार फूट उंचीवर वसलेल्या वार्शी गावात फक्त पाच मतदारांसाठी त्यांच्या घरासमोर मतदान केंद्र बांधले जाणार आहे.

लडाख राज्यात दोन जिल्हे आणि चार विधानसभा मतदारसंघातील १,८२,५७१ मतदारांवर आधारित लोकसभेची एकच जागा आहे. या जागेसाठी २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. संपूर्ण राज्यात ५७७ मतदान केंद्रे उभारली जात असून त्यापैकी केवळ ३३ शहरी भागात आहेत. उर्वरित ५४४ मतदान केंद्रे ग्रामीण आणि दुर्गम भागात आहेत. लेह जिल्ह्यातील नुब्रा विधानसभा मतदारसंघातील वार्शी गावात फक्त एका कुटुंबासाठी मतदान केंद्र केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR