26 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रप्रचार कमी डान्सच जास्त

प्रचार कमी डान्सच जास्त

इचलकरंजी : बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांच्या प्रचारात एका बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला. याचा व्हीडीओ व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी इथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. या महिला मेळाव्याला आज सिनेअभिनेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदाने हजेरी लावली. यावेळी गोविंदाने आपल्या डान्सने महिलांची मन जिंकली. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR