28 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयप्रधानमंत्री मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट

जामीनदार आवश्यक नाही

नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज अंतर्गत, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी म्हणजेच एमएसएमईसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते, ते आता २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांचा कालावधी दिला जाईल. मात्र, ज्यांनी कर्ज घेऊन या योजनेत पैसे जमा केले आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. सरकारने २०२४-२०२५ साठी २.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. डिसेंबर २०२४ पर्यंत ३.६ लाख कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे.

म्हणजे उद्दिष्टाच्या १५६ टक्के. तथापि, या योजनेंतर्गत कर्ज घेणारे बहुतेक लोक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाहीत. एका अहवालानुसार, मुद्रा कर्जावरील ठढअ म्हणजेच नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट ३२% वर पोहोचला आहे. याचा अर्थ ३२% लोक कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR