18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाप्रवीण कुमारने हार्दिकवर साधला निशाणा

प्रवीण कुमारने हार्दिकवर साधला निशाणा

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाला हार्दिक पांड्याच्या रूपाने नवा कर्णधार मिळाला आहे. तर माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ फलंदाज म्हणून मुंबईसोबत खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाने कर्णधार बदलण्याचे पाऊल आयपीएल २०२४ मधील सर्वांत चर्चेचा विषय ठरला आहे. दोन वर्षे गुजरात टायटन्सचे यशस्वी कर्णधारपद भूषवल्यानंतर हार्दिकला मुंबई संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणावर अनेक स्तरावरून टीका करण्यात आली आहे. तर माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारनेही यावर प्रतिक्रिया देत हार्दिकवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये एका पत्रकाराने भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमारला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्यावर प्रश्न विचारला होता. पत्रकाराने विचारले की, मुंबई इंडियन्सने घाईघाईत कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला का? की हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय योग्य होता?

यावर प्रवीण म्हणाला- गेल्या दोन महिन्यांपासून तो दुखापत झाली म्हणून क्रिकेट खेळत नाही. देशासाठी खेळत नाही, किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळत नाही आणि फक्त आयपीएलमध्ये खेळतो. अशा गोष्टी चालत नाहीत. तुम्हाला पैसे कमावण्यापासून कोणी रोखत नाही. मात्र त्याने राज्य आणि देशासाठी खेळले पाहिजे. फक्त आयपीएलला महत्त्व देऊन चालणार नाही असा टोला प्रवीणने हार्दिकला लगावला. यासोबतच आयपीएलला प्राधान्य देण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला महत्त्व देण्याचा सल्ला दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR