34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरखैराव येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

खैराव येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

माढा : एखाद्या खेडे गावात २० ग्रामीण साहित्य संमेलने करणे ही सोपी गोष्ट नाही. जत्रांच्या माध्यमातून गावात ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करून लोकांमध्ये वैचारिक जागृती करण्याचा अनोखा उपक्रम सर्व महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले .

नागनाथ देवस्थान ट्रस्ट आणि कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खैराव (ता. माढा) येथे २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्‌घाटक उद्योजक व चित्रपट निर्माते मनोज कदम, जलतज्ज्ञ अनिल पाटील, कवी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील, प्रकाश गव्हाणे, विलासराव देशमुख, प्रकाश महामुनी, कवी अशोक मोहिते, विद्याधर गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंदे यांनी गावगाडा, ग्रामीण संस्कृती टिकली पाहिजे. घरातील वृद्धांना आदर, सन्मान मिळाला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र वृद्धांची अवस्था बिकट आहे. वृद्धाश्रमांची वाढणारी संख्या ही भूषणावह बाब नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी दिनकर नागटिळक, बाळासाहेब पाटील, पंडितराव पाटील, प्रतापराव नागटिळक, शरद नागटिळक, रामेश्वर नागटिळक, समाधान नागटिळक, ज्ञानेश्वर पाटील, नितीन साठे, जयसिंग साठे, गणपतराव साठे, काका पाटील, नितीन नागटिळक, अशोक शिंगाडे, संदीप नागटिळक, स्वप्नील रणपिसे, विश्वास क्षीरसागर, साहेबराव नागटिळक, नारायण मगर, सत्यवान साठे, संजय चव्हाण, नितीन नागणे, दिलीप नागटिळक आदी उपस्थित होते.

या साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अरुण नवले (साहित्य) मैनाबाई भांगे (सेंद्रिय शेती) सुजीत परबत (कृषी), अमोल थिटे, (काव्य) वडाची वाडी (ता. माढा) आदर्श गाव, आदर्श ग्रंथालय धर्मवीर सार्वजनिक वाचनालय, निमगाव (वाघा), अरविंद मोटे आणि राजेंद्र गुंड (पत्रकारिता) विलास क्षीरसागर (शिक्षण) विशेष सन्मान निवृत्त प्राचार्य सुभाषराव नागटिळक यांना सन्मानीत करण्यात आले.

खैराव येथे मागील अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येकवेळी साहित्यिक, कवी तसेच प्रमुख पाहुण्यांना मानेगाव मार्गे गावात यावे लागे. यासाठी सीना नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अनेक संमेलनाला उपस्थित असलेल्या आमदार बबनराव शिंदे यांच्या समोर ही मागणी खैरावचे उपसरंपच पंडित पाटील, कवी फुलचंद नागटिळक व ग्रामस्थांनी लावून धरली त्यामुळे हा पुल झाला यासाठी सर्व कवी उद्‌घाटक संमेलानाध्यक्ष यांच्या उपस्थित या पुलावर आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR