22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयप्रिडेटर ड्रोन हवेतच देणार शत्रूला सडेतोड उत्तर, अमेरिकेसोबत करार

प्रिडेटर ड्रोन हवेतच देणार शत्रूला सडेतोड उत्तर, अमेरिकेसोबत करार

नवी दिल्ली : अमेरिकेसोबत झालेल्या करारान्वये प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकच भर पडणार आहे.

अमेरिकेने भारताला ३१ टद-9इ प्रीडेटर ड्रोन देण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौ-यात या कराराची घोषणा करण्यात आली होती. ३१ ड्रोनशिवाय इतर अनेक तंत्रज्ञान आणि शस्त्रे भारत खरेदी करीत आहे. संपूर्ण कराराची अंदाजे किंमत सुमारे ४ अब्ज डॉलर्स (सुमारे ३२ हजार कोटी रुपये) आहे.

आधुनिक मॉडेल्ससह सुसज्ज हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोनमध्ये सर्व हवामानात उड्डाण करण्याची आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता आहे.

प्रीडेटर ड्रोन वापरण्याचा उद्देश…
या करारांतर्गत, भारताला दोन प्रकारचे प्रीडेटर ड्रोन मिळतील – स्काय गार्डियन आणि सी गार्डियन. सागरी सीमेवर पाळत ठेवण्यासाठी सी गार्डियन ड्रोन आणि जमिनीच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी स्काय गार्डियन ड्रोन तैनात केले जातील.

३१ ड्रोनपैकी आर्मी आणि एअर फोर्सला प्रत्येकी ८ स्काय गार्डियन श्ी१२्रङ्मल्ल ड्रोन्स मिळतील. तर, नौदलाला टद-9इ च्या १५ सी गार्डियन श्ी१२्रङ्मल्ल देण्यात येतील.

अमेरिकेच्या ड्रोनची वैशिष्ट्ये…
स्काय गार्डियनची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की सुरक्षा दलांना कमी वेळेत परिस्थितीजन्य माहिती मिळू शकेल. ड्रोन लिंक्स मल्टी-मोड रडार आणि प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड सेन्सर्ससह येतो. आपोआप टेकऑफ आणि लँडिंग करू शकतो. विशेष म्हणजे ते ४० तासांपेक्षा जास्त वेळ सतत काम करू शकतात.

अहवालानुसार, ते ४० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात आणि १,८५० किलोमीटरपर्यंत माहिती गोळा करू शकतात.

सीमेवरील सुरक्षा अशी होणार मजबूत
अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन सध्याच्या आणि भविष्यातील धोक्यांना तोंड देण्याची भारतीय सुरक्षा दलांची क्षमता सुधारेल. या करारानंतर चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर भारताची स्थिती मजबूत होईल. या मानवरहित हवाई वाहनांमध्ये लढाऊ विमानांसारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा डागण्याची क्षमता आहे.

भारताने अशी केली खरेदी
अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पोरेशन एजन्सीने भारत आणि अमेरिका यांच्यातील सुमारे ४ अब्ज डॉलरच्या कराराचा तपशील दिला आहे. ३१ टद-9इ प्रीडेटर ड्रोन व्यतिरिक्त, शस्त्रे आणि त्यांच्यामध्ये स्थापित तंत्रज्ञान देखील समाविष्ट आहे. याचप्रमाणे १६१ एम्बेडेड ग्लोबल पोझिशनिंग आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम, ३५ रिओ ग्रांडे कम्युनिकेशन्स इंटेलिजन्स सेन्सर सूट, १७० अॠट-114फ हेलफायर क्षेपणास्त्रे, १६ ट36ए9 हेलफायर कॅप्टिव्ह एअर ट्रेनिंग क्षेपणास्त्रे, २१० ॠइव-39इ/इ लेझर लहान व्यासाचा बॉम्ब, सर्विलांस सिस्टम आणि रडार यांचाही समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR