24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeराष्ट्रीयमध्यमवर्गीयांसाठी नवी योजना आणण्याची तयारी

मध्यमवर्गीयांसाठी नवी योजना आणण्याची तयारी

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर, शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. या वर्गासाठी सरकार एक नवी हाऊसिंग स्कीम लॉन्च करू शकते, असे मानले जात आहे. लोकांचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

हाऊसिंग स्कीमअंतर्गत लोनवरील व्याजावर मोठी सूट मिळू शकते. या योजनेंतर्गत ९ लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर ३-६.५% दरम्यान वार्षिक व्याज सब्सिडी दिली जाऊ शकते. याच बरोबर, २० वर्षांच्या कार्यकाळासाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमीचे होम लोन या योजनेच्या कक्षेत येईल. काही दिवासंपूर्वी माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, ही योजना पुढील ५ वर्षांसाठी असेल आणि सरकार या योजनेवर सुमारे ७.२ अब्ज डॉलर एवढा खर्च करेल. काही दिवसांपूर्वी, या योजनेसंदर्भात सरकारी अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधिय यांची बैठकही झाली आहे.

२०२४ मध्ये लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही सरकारची ही नवी योजना महत्त्वाची मानली जात आहे. उज्ज्वला योजनेच्या अनुदानात करण्यात आलेली १०० रुपयांची अतिरिक्त वाढही याचाच एक भाग आहे. २०२४ च्या अंतरिम बजेटमध्ये जनसामान्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. एवढेच नाही, तर सरकार पीएम-किसान योजनेचा हप्ता देखील वाढवू शकते. सध्या या योजनेंतर्गत शेतक-यांना दर वर्षी ६००० रुपये मिळतात. मात्र आता ते १० हजार रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR