35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रस्फोटकांसह प्रेशर कुकर्स जप्त

स्फोटकांसह प्रेशर कुकर्स जप्त

नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला

गडचिरोली : प्रतिनिधी
नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी उद्ध्वस्त केली. स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स नष्ट करण्यात आले. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनीही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा वावर वाढला असल्याचे समोर आले. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात पोलिसांनी आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींकडे पोलिस लक्ष देऊन आहे. आता मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केली.

माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली होती. या बाबतची विश्वासार्ह माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्या आधारे पोलिसांनी तात्काळ शोध अभियान राबविले. सोबतच सुरक्षा दलांची जोरदार तैनातीही करण्यात आली. त्यामुळे माओवाद्यांना त्यावेळी या क्लेमोअर्स स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. टिपागड परिसरात एक निश्चित आणि अचूक ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली. यात एका उंच डोंगरावर मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तो सर्व साठा जप्त करण्यात आला.

जमिनीखाली पुरली होती स्फोटके
यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले. गडचिरोलीच्या टिपागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली मोठ्या प्रमाणात सुरंग पुरून ठेवले होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ही सर्व स्फोटके जप्त करत नष्ट केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR