38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमुंडे, सोनवणेंसह ७ उमेदवारांना नोटीस

मुंडे, सोनवणेंसह ७ उमेदवारांना नोटीस

बीड : प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेल्या ७ उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली. नोंदवही लेखांची प्रथम तपासणी न करणा-या उमेदवारांमध्ये करुणा धनंजय मुंडे, शेषेराव चोकोबा वीर, गोकुळ बापूराव सवासे, प्रकाश भगवान सोळंके, राजेंद्र अच्युतराव होके, शेख तौसिफ अब्दुल सत्तार, शेख एजाज शेख उमर यांची नावे आहेत. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे, यांना आणि एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोन उमेदवारांना तपासणीसाठी सादर केलेल्या निवडणूक खर्चातील तफावतीबाबत नोटीस जारी करण्यात आलेली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रथम खर्चाची नोंदवही शनिवार दि. ४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत खर्च सनियंत्रण कक्ष ३९ बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय विज्ञान केंद्र (छखउ) कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून अथवा प्रतिनिधी उपस्थित राहून नोंदवही तपासणी करून घेणे बंधनकारक होते. मात्र, ज्या उमेदवार अभिलेखाची तपासणी करण्यास आलेली नाही, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR