नवी दिल्ली : उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्याने सध्या खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांत तर दक्षिणेतील काही राज्यांत कांद्याने ७० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील ६ राज्यांमध्ये कांद्याची किंमत ६० रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.
त्यामुळे केंद्र सरकार अलर्टवर आहे. कांद्याने यापूर्वी पण देशात रोष वाढला होता. कांद्याने यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरे पण दिले होते. केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाययोजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने काद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजारात आणला आहे. पण त्याचा थेट परिणाम दिसला नाही. अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किमती ७० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहेत. किरकोळ बाजारात हा भाव ८० रुपये किलोवर पोहोचल्याचे चित्र आहे. तर काही राज्यांत हा भाव ६० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.