27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयलालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांनी अडवाणींना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या समोर आलेल्या या भेटीच्या व्हीडीओमध्ये नरेंद्र मोदी अडवाणी यांचा हात धरून चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर नेतेही उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आडवाणी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे राष्ट्र उभारणीच्या कामातले त्यांचे योगदान भारतीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहणार असल्याचे त्यांनी एक्स समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR