22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदी विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार

पंतप्रधान मोदी विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार

गत निवडणुकीवेळी केदारनाथ येथे केले होते ध्यान

नवी दिल्ली : येत्या १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या ५७ जागांसाठी मतदान होत आहे. तर, ३० मे रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. दरम्यान, प्रचार थांबल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. केदारनाथप्रमाणे यंदा ते कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी ३१ मे रोजी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देतील आणि दिवसभर येथे ध्यानस्त होतील. त्यापूर्वी ते गुरुवारी(३० मे) पंजाबमध्ये रॅलीही घेणार आहेत. पंजाबमधील निवडणूक रॅलीनंतर ते तामिळनाडूच्या दौ-यावर जाणार असून तिथे त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम असेल. मात्र, अद्याप पक्षाकडून ३१ मे आणि १ जूनचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

२०१९ मध्ये केदारनाथमध्ये ध्यान केले
यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीदरम्यान शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबल्यानंतर पीएम मोदींनी थेट उत्तराखंडमधील केदारनाथ गाठले होते. तिथे रुद्र गुहेत मोदींनी बराचवेळ धान्य केले. त्यांचे धानस्त अवस्थेतील फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आता यावेळी पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जाणार आहेत.

या जागांसाठी १ जून रोजी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR