नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी रोड शो केला. नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली आहे. पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात दर्शन व आरती, तसेच कुंभमेळा होणाऱ्या त्या गोदाघाटाची पाहणी व शक्य झाल्यास तेथेही आरतीचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पुर्ण झाला असून ते रामतीर्थकडे रवाना झाले आहे आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी गोदावरीचे पाणी हातात घेऊनअर्घ्य दान केले आहे.
विशेष अनुष्ठानाची घोषणा
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून ११ दिवस चालणाऱ्या विशेष अनुष्ठानाची घोषणा केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया साइटच्या अधिकृत हँडलवरून जारी केलेल्या ऑडिओ संदेशात त्यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत सुरू राहणारा हा अनुष्ठान आज (शुक्रवार) नाशिक येथील पंचवटी धाम येथून सुरू होत आहे. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार असून हे माझे भाग्य आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करत आहे.