29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाचा बहिष्कार

अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाचा बहिष्कार

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमांना काही जणांना गुरुवारी रात्री तर काही जणांना शुक्रवारी सकाळी निमंत्रण पाठवण्यात आसे आहे. शासनाच्या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका असतात त्यावर स्थानिक आमदार आणि खासदारांचे नाव असणे आवश्यक आहे. मात्र निमंत्रणपत्रिकेवर नजर मारल्यास शिवसेने ठाकरे गटाच्या स्थानिक खासदारांचे नाव नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत नाही. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मंत्र्याची नावे आहेत. सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावे आहेत. मात्र त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंताचे नाव नाही. शिवाय माजी मंत्री असलेले आदित्य ठाकरे, तसेच आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सुनील शिंदे, सचिन आहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत.

३० हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
मोदी मुंबईत जवळपास ३० हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-१ चे औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR