33.8 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमहाराष्ट्रखासगी बस पेटली; प्रवाशांचा सामान खाक

खासगी बस पेटली; प्रवाशांचा सामान खाक

जळगाव : दिवाळीनिमित्ताने गावाकडे आलेले परतीच्या प्रवासाला लागले आहेत. जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक अचानक पेट घेतला. यानंतर प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन धावपळ केली आणि या घटनेच्या थरारत २० प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, त्यांचे सर्व सामान जाळून खाक झाले आहे. रावेर- सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलाजवळ ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

रावेरकडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्सची रावेर-पुणे बस प्रवाशांना घेऊन १८ नोव्हेंबरला जात असताना रावेर-सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलापुढील वळणावर बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने गाडीतून धूर निघत (Fire) असल्याचे कळल्याने आणि सायंकाळी त्यावेळी काहीसा उजेड असल्याने सर्व प्रवासी भराभर बसमधून खाली उतरले. रावेर, सावदा आदी ठिकाणच्या अग्निशमनने आग विझविली. मात्र या आगीत प्रवाशांचा सर्व सामानाचा जाळून कोळसा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR