30.3 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeसोलापूरसोलापूर विमानसेवेच्या पूर्वपरवान्यासाठी मे मध्ये प्रस्ताव : जिल्हाधिकारी

सोलापूर विमानसेवेच्या पूर्वपरवान्यासाठी मे मध्ये प्रस्ताव : जिल्हाधिकारी

सोलापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. या कामांचा वेग पाहता एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामे ७० ते ८० टक्के पूर्ण होतील, त्यानंतर विमानसेवेचा पूर्व परवाना मिळविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टी, संरक्षक भिंत आणि प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा आढावा सातत्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद घेत आहेत. ही सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. होटगीरोड वरील विमातळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्व परवाना मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून पाहणी केली जाईल. या पाहणीत काढलेल्या त्रुटीची पुर्तता केल्यानंतर विमानसेवेचा पूर्व परवाना मिळू शकतो.

होटगीरोडवरील विमानतळावरून ७२ आसनांचे विमान उतरविण्यासाठी व उडविण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा ठरत आहे. साध्या अस्तित्वात असलेल्या चिमण्यांना बांधकाम परवाना आहे. या चिमण्यांची उंची कमी करण्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कारखान्याला पत्र पाठविले आहे. या पत्रावर कारखान्याने १६०० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे सुनावणी सुरू आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीची उंची कमी न करता, आहे त्या स्थितीत ५५ ते ६० आसनांच्या विमानाची सेवा होटगीरोड विमानतळावरून सुरू करता पेयेईल अशी माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR