31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरवळसंगी येथे आढळला अतिविषारी मण्यार साप

वळसंगी येथे आढळला अतिविषारी मण्यार साप

अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील वळसंगी येथील राजू माने यांच्या घरात सकाळी विटांच्या भिंतीमध्ये मण्यार जातीचा साप दिसून आला असता कल्याण गायकवाड यांनी ताबडतोब शिरूर येथील सर्पमित्र अमोल शिरूरकर व अशोक कांबळे यांना संपर्क साधला असता त्यांनी वळसंगी येथे जाऊन मण्यार या अतिविषारी सापाला पकडले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सापाचा वावर वाढतो म्हणून साप आपला निवारा थंड ठिकाणी मानवी वस्तीकडे वळतात मण्यार हा साप नागापेक्षा पाच पट्टीने विषारी साप असून त्याचे विष निरोटोक्सिक असते जे मानवाच्या मेंदूवर परिणाम करते. या सापाचा रंग पूर्ण काळा असून पांढरे आडवे पट्टे असतात या सापाने चावा घेतल्यास माणसाची शुद्ध हरवू शकते. पोट दुखू लागते तीव्र वेदना होतात वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुप गेल्या बारा वर्षांपासून वन्यजीव वाचवण्याचे काम करीत आहे. आपल्या परिसरात प्रामुख्याने चार विषारी साप आढळतात त्यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, तर बिनविषारीमध्ये, धामण, कवढ्या, रुका, मांडूळ. दिवड. नाणेटी. तस्कर. गवत्या. कुकरी, डुरक्या, धूळनागीण, अजगर, वाळा, हे साप आढळून येतात.
सर्पमित्र शिरूरकर ग्रुपमध्ये ऋषिकेश बनसोडे, दयानंद हाके, अरमान शेख, विष्णू कांबळे, दत्ता कोंपलवाड, सिद्धार्थ काळे हे सहकारी विनामूल्य वन्यजीव वाचविण्याचे काम करतात. आतापर्यंत या ग्रुपने चाळीस हजार साप व तसेच, हरीण, मोर, घोरपड, मरलांगी, कासव, उदमांजर, घुबड,असे वन्यजीव पशुप्राण्यांना जीवनदान दिले आहे. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास न घाबरता न मारता आमच्या ग्रुप च्या हेल्पलाईन मो. ७७०९७७९७९८ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR