34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूर११ महिन्यांपासून बालसंगोपन योजनेतील लाभार्थी मदतीपासून वंचीत

११ महिन्यांपासून बालसंगोपन योजनेतील लाभार्थी मदतीपासून वंचीत

सोलापूर : जिल्ह्यातील चार हजार ४३० निराधार मुलांना ११ महिन्यांपासून शासनाकडून एक रुपयाची देखील मदत मिळाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामध्ये ७४ अनाथ बालकांचाही समावेश आहे. ऑनलाइन पद्धतीने थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयोग केला जात असल्याने विलंब लागत असल्याचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून सांगत आहेत. पण, ११ महिन्यांपासून त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळालेला नाही .

विधवा महिला, परितक्त्या, दुर्जर आजाराने ग्रस्त, तुरुंगात असलेले पालक, दिव्यांग पालकांच्या दोन मुलाना (१८ वर्षांपर्यंत) महिला व बालविकास विभागातर्फे बालसंगोपन योजनेतून दरमहा २२५॰रूपयांची मदत दीली जाते. त्यात आई वडील दोन्ही नसलेल्या अनाथ मुलांचाही समावेश आहे. त्यातून त्या मुलांचा शिक्षणासोबतच इतर खर्चहीभागतो. त्यामुळे या लाभार्थीना दरमहा मदत देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, तब्बल ११ महिन्यांपासून बालसंगोपन योजनेतील लाभार्थीना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षणासह दैनंदिन खर्च भागवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

एक-दोन महिन्यात योजनेतून मदत मिळेल अशी आशा लाभार्थींना होती, पण११ महिन्यांपासून त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. बालसंगोपन योजनेतील लाभार्थीना यापूर्वी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातून दरमहा मदत दिली जात होती. पण, आता वरिष्ठ कार्यालयातूनच थेट लाभार्थीच्या खात्यात दरमहा मदतीची रक्कम जमा होणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याने काही महिन्यांची मदत लाभार्थीना मिळालेली नाही. पण, काही दिवसांत मागील सर्व मदत लाभार्थीना मिळेल असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी सांगीतले.जिल्हा महिला व बालविकास विभागाचे काम महत्वपुर्ण आहे.

बालविवाहावर देखरेख व नियंत्रण, अनाथ मुलांचे प्रमाणपत्र, बालसंगोपनातील लाभार्थीची निवड व त्यांना लाभ, बालविवाह झालेल्या मुलींचे समुपदेशन बालविकास . अशी प्रमुख कामे हा विभाग प्रामुख्याने पार पाडतो. परंतु, काही वर्षात या विभागाला पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ मिळालेले नाही. त्यामुळे निराधार, निराश्रित मुलांना बालसंगोपनाचा लाभ देण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर वेळेत कार्यवाही होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. सध्या सातशेहून अधीक अर्ज या कार्यालयाकडे प्रलंबीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR