नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याला कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफचा करार वाढवण्याची घोषणा केली.
राहुल द्रविड २०२१ मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले होते. दोन वर्षे मुख्य प्रशिक्षपद सांभाळल्यानंतर आता त्याच्या कराराची मुदत संपली होती.
नुकत्याच संपलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ नंतर बीसीसीआयने द्रविडला करार वाढविण्याची ऑफर दिली होती. त्याबाबत बीसीसीआयने राहुल द्रविडशी चर्चा केली आणि एकमताने करार पुढे वाढवण्यास सहमती दर्शविली.