राज्यावर पुन्हा पावसाचे संकट

पुणे : हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळतो. मोंथा चक्रीवादळादरम्यानही वा-यासह मोठा पाऊस झाला.

पुढील ५ ते ६ दिवसांत वायव्य भारतात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही, पूर्व उत्तर प्रदेश वगळता. राज्यात सतत वातावरणात बदल होताना दिसत आहेत. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे ढग कायम असणार आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने चक्राकार वा-याची स्थिती आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राज्यात पावसाच्या हाहाकाराने मोठे नुकसान झाले असून शेतक-यांचे नुकसान झालंय. मात्र, पाऊस काही थांबण्याचे नाव अजिबात घेत नाही. पाऊस अन ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची चटके कमी झाल्याचे दिसत आहे. ऑक्टोबर महिना ऑक्टोबर हिट अर्थात वाढत्या उष्णतेसाठी ओळखला जातो. साधारणपणे या काळात तापमान झपाट्याने वाढवण्याचे चटके जाणवतात. मात्र, यंदाच्या आक्टोबर नेहमीच्या ऑक्टोबर हिट पासून पूर्णपणे वेगळा आहे. यंदा हवामानाने अपेक्षित कलाटणी घेतली उष्णतेचे शहरांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वारासह पावसाने हजेरी लावली. परिणामी नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये जाणवणारे उष्णतेचे चटके यांचा जवळपास गायब झाले होते.

यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नोव्हेंबर महिन्यात देखील तिच स्थिती कायम आहे. पुण्यात थंडीला सुरुवात झाल्याचे बघायला मिळतंय. पुढील पाच दिवसांत पारा आणखी खाली येणार असल्याचे सांगितले जात आहे. शहरात संपूर्ण ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची स्थिती होती. नंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पावसाची हजेरी लावली. मात्र आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतली असून किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. दरम्यान पुढील पाच ते सहा दिवसांत कमाल आणि किमान तापमानांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news