पाटणा : बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात भाजपाने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून नितीश कुमार यांनी बिहारला इस्लामिक स्टेट घोषित करण्याची घोषणाही या निर्णयांसोबतच करून टाकावी असा टोला भाजपाने लगावला आहे.
हे संपूर्ण प्रकरण बिहार सरकारच्या सुट्यांशी संबंझित आहे. बिहार सरकारने शुक्रवारी साप्ताहित सुटी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच बिहारमध्ये जे प्रदेश मुस्लिम बहूल आहेत, म्हणजेच मुस्लिम बहुसंख्य असतील तिथे आता शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असेल. मुस्लिमांसाठी शुक्रवारी सुटी जाहीर करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य आहे. या निर्णयामध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले की, हा आदेश केवळ उर्दू शाळांसाठी नाही तर मुस्लिम बहूल भागातील कुठल्याही सरकारी शाळांनाही लागू राहिली. तिथे आता रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुटी दिली जाईल. याबाबत शिक्षण विभागाकडून अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी त्या जिल्ह्याच्या डीएमची परवानगी आवश्यक असेल. त्यांनी तशी परवानगी दिली की, शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुटी जाहीर केली जाईल.