18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeनांदेडअवयव दान जनजागृतीने रामानंद मोदानी यांची पुण्यतिथी साजरी

अवयव दान जनजागृतीने रामानंद मोदानी यांची पुण्यतिथी साजरी

नांदेड : मानवत येथील रहिवासी असलेले रामानंद सत्यनारायण मोदाणी यांचा गेल्या वर्षी मेंदू निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर मोदाणी कुटुंबियांनी रामानंद यांच्या अवयवदान केलेल्या महान कार्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने येथील बालाजी मंदिर मगन पुरा ग्रुप नांदेडच्या वतीने स्व. रामानंद मोदाणी यांची पुण्यतिथी मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी साजरी करीत उपस्थितांना अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यात आली.

सांगलीतील प्रसिध्द व्यावसायिक व मुळचे परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवासी असलेले रामानंद सत्यनारायण मोदानी यांच्या मेंदूत उच्च रक्तदाबामुळे रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर मेंदूवर शस्त्रक्रिया केली परंतू वाढत्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मेंदू निकामी झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रामानंद यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयानुसार त्यांचे हृदय, फुप्फुस, यकृत, डोळ व किडणी वेगवेगळया शहरात दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी कोल्हापूर येथून विमानाने पाठवून गरजू रूग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले होते.

मृत्यूनंतरही रामानंद मोदानी त्यांचे अवयव दान करण्यात आलेल्या रूग्णांच्या रूपाने जिवंत आहेत. या निमित्ताने नांदेड शहरातील मगनपुरा भागातील बालाजी मंदिरात स्व. रामानंद मोदाणी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त डीवायएसपी डी. एन. ढोले, ऍड. रावसाहेब देशमुख, ऍड. बालाजी घोरपडे, ऍड. सुभाष ढाणे, डॉ. शुभम मुंदडा, ऍड. प्रतीक्षार्प्रतीक्षा मानधने, स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे सर्व सदस्य, संदीप कोरके पाटील, मोदाणी परीवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अवयव दान जनजगृतीचे महत्व समजावून सांगण्यात आले.

मोदाणी परिवाराने केलेल्या अवयव दाना बद्दल महाराष्ट्र शासनाच्या झेड टीसीसी यांच्या वतीने दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथे मोदाणी परीवाराचा सत्कार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात मोदाणी परीवाराच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रमाद्वारे अवयव दानाचे महत्व समजावून सांगण्यात आले आहे. नांदेड येथे झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालाजी मंदिर मगन पुरा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR