35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडारविचंद्रन अश्विनचे कसोटीत ५०० बळी पूर्ण

रविचंद्रन अश्विनचे कसोटीत ५०० बळी पूर्ण

राजकोट : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील तिस-या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स पटकावण्याचा कारनामा केलाय. अश्विने राजकोट कसोटीच्या दुस-या दिवशी जैसी क्राऊलीला बाद करत हा विक्रम नावावर केला. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी हा कारनामा केला होता.

रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकवणारा दुसरा भारतीय आहे. त्याने ९८ सामने खेळत हा विक्रम नावावर केला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान ५०० विकेट पटकावण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी ५०० विकेट पूर्ण करण्यासाठी केवळ ८७ सामने खेळले होते. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी ५०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १०५ सामने खेळले होते. शेन वॉर्न यांना हा विक्रम नावावर करण्यासाठी १०८ सामने खेळावे लागले होते. त्यामुळे रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे.

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकावणारा ९ वा गोलंदाज ठरलाय. तर ५०० बळी पूर्ण करणारा तो ५ वा फिरकीपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त बळी मुरलीधरन यांच्या नावावर आहेत. त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट पटकावल्यात. त्यानंतर शेन वॉर्न यांच्या नावावर ७०८ विकेट्सची नोंद आहे. तर जेम्स अँडरसन याच्या नावावर ६९५ विकेट्स आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी ६१९ विकेट्स पटकावल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR