30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरलोकसभेच्या लढतीत आजी-माजी व भावी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभेच्या लढतीत आजी-माजी व भावी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

औसा : संजय सगरे
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे घड्याळ व महाआघाडीचे उमेदवार उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश्राजे निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी औसा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे असून त्यांच्यासोबत भाजपात नवप्रवेशित माजी मंत्री बसवराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्याकडे आहेत तर महाआघाडीची प्रमुख जबाबदारी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार दिनकर माने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख यांच्याकडे आहे. मागील १५ दिवसांत या मंडळींनी औसा विधानसभा क्षेत्रातील १६० गावे पिंजून काढली आहेत.

लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेची तयारी या मंडळींनी केली आहे. विद्यमान आमदार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारसंघात जनतेच्या संपर्कात असतात. सत्ताधारी पक्षाचे व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असल्याचे औसा मतदारसंघात अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणल्याने विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे तर माजी आमदार दिनकर माने व श्रीशैल्य उटगे व डॉ. अफसर शेख हे त्यांच्या पक्षाचे आगामी विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार आहेत.

या इच्छुकांनी लोकसभा निवडणूक आखाड्यात आपल्या विधानसभेचे मैदान तयार केले आहे. संपर्कासाठी आलेल्या संधीचे सोने या मंडळींनी केले आहे. औसा मतदारसंघात एकूण ३०७ मतदान केंद्रं असून प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या भावी आमदारांनी केला आहे . येत्या ४ जून रोजी लागणा-या निकालाकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR