वृत्तांकनाच्या ऑडिओ-व्हीडीओ क्लिप्सच्या वापरावरच निर्बंध

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, न्यायालयीन कामकाजातील ऑडिओ-व्हीडीओ क्लिप्स शेअर करणे किंवा अपलोड करण्यावर घालण्यात आलेल्या अलीकडील अंतरिम निर्बंधांचा अर्थ मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांना न्यायालयीन सुनावण्यांचे वृत्तांकन करण्यास बंदी असा होत नाही. हे निर्बंध केवळ न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिप्सचा वृत्तांकनात वापर करण्यापुरतेच मर्यादित आहेत असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) आणि ध्वनिचित्रमुद्रण (रेकॉर्डिंग) यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान हे स्पष्टीकरण दिले.
२४ जुलै रोजी दिलेल्या अंतरिम आदेशातील परिच्छेद ११ संदर्भात काहीसा संभ्रम अद्याप कायम आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले. त्या परिच्छेदात सुनावणीतील क्लिप्स शेअर करण्यावरील निर्बंधामुळे मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांच्या वृत्तांकनावर बंदी येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. हा संभ्रम दूर करताना खंडपीठाने म्हटले, या परिच्छेदातून हे स्पष्ट होते की, मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांनी न्यायालयीन कामकाजाचे वृत्तांकन करण्यावर सर्वंकष बंदी घालण्याचा या आदेशाचा कोणताही उद्देश नाही. मान्यताप्राप्त वृत्तसंस्था न्यायालयीन कामकाजाचे वृत्तांकन करू शकतात आणि कायदेशीर घडामोडी तसेच न्यायालयीन निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, अशा वृत्तांकनात न्यायालयीन कामकाजातील ऑडिओ किंवा व्हीडीओ क्लिप्सचा वापर करता येणार नाही, यावर न्यायालयाने भर दिला.

निर्बंधांचे पालन करावेच लागेल
आदेशात म्हटले आहे वृत्तसंस्था न्यायालयीन कामकाजाचे वृत्तांकन सुरू ठेवू शकतात आणि कायदेशीर घडामोडी तसेच न्यायालयीन निर्णयांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतात. मात्र, अशा वृत्तांकनात न्यायालयीन कामकाजातील ऑडिओ किंवा व्हीडीओ क्लिप्सचा वापर करता येणार नाही. ‘थोडक्यात, वृत्तसंस्थांना न्यायालयीन कामकाजाचे वृत्तांकन करण्याची मुभा कायम राहील. मात्र, त्यांना १० व्या परिच्छेदातील निर्बंधांचे पालन करावेच लागेल.

विनापरवाना बंदीच
२४ जुलैच्या आदेशातील परिच्छेद १० नुसार, संबंधित न्यायालयाच्या (सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय) रजिस्ट्रार जनरल यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ किंवा व्हीडीओ रेकॉर्डिंगमधील भाग काढणे, त्यात संपादन करणे, प्रसारित करणे, पुन्हा पोस्ट करणे, अपलोड करणे किंवा त्यातून आर्थिक लाभ (मॉनेटायझेशन) मिळवणे यास सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवर बंदी आहे.

आरटीआय कार्यकर्त्यांचा अर्ज मंजूर
सुनावणीदरम्यान न्यायालयाने माहितीच्या अधिकारासाठी (आरटीआय) कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी दाखल केलेला हस्तक्षेप अर्जही मंजूर केला. न्यायालयीन कामकाजाच्या क्लिप्स शेअर करण्यावरील सर्वंकष बंदीला विरोध करणा-या या अर्जदारांना हस्तक्षेपकर्ते म्हणून न्यायालयाला सहाय्य करण्याची परवानगी देण्यात आली.

पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला
या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ सप्टेंबर २०२६ रोजी ठेवण्यात आली असून तोपर्यंत केंद्र सरकार, सोशल मीडिया मध्यस्थ (इंटरमीडियरीज) आणि विविध उच्च न्यायालयांना त्यांची भूमिका स्पष्ट करणारे उत्तर सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. पत्रकार हर्षिता ग्रोव्हर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे. न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ-व्हीडीओ रेकॉर्डिंगमधील भाग कापणे, संपादित करणे, प्रसारित करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवण्यासंदर्भात नियमावली तयार करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news