20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeउद्योगकिरकोळ महागाईचा दर ५ वर्षांतील नीच्चांकावर

किरकोळ महागाईचा दर ५ वर्षांतील नीच्चांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
किरकोळ महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यात किंचित घटून ३.४५ टक्क्यांवर म्हणजेच पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी सोमवारी जाहीर केली.

एप्रिल महिन्यात ४.८३ टक्के असलेला किरकोळ महागाई दर घसरण होऊन मे महिन्यात तो ४.७५ टक्क्यांवर आला. ही त्याची मे २०२३ नंतरची नीचांकी पातळी ठरली. त्यावेळी महागाई दर ४.३१ टक्के पातळीवर होता. खाद्यवस्तूंतील किंमतवाढ मे महिन्यात ८.६९ टक्के नोंदविण्यात आली. एप्रिलमधील ८.७० टक्क्यांच्या तुलनेत ती नाममात्र घसरली असली तरी एकूण निर्देशांकातील २६ टक्के

घटकांमधीलकिंमतवाढीचा दर ५ टक्क्यांच्या आसपास राहिला, जो जानेवारी २०२० नंतरचा नीचांकी स्तर आहे. मात्र, खाद्यवस्तूंच्या घटकांतील, विशेषत: भाज्या आणि कडधान्यांसह विशिष्ट खाद्य श्रेणींमधील उच्च चलनवाढ हा चिंतेचा विषय असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे होते.

वार्षिक किरकोळ महागाई जुलैमध्ये ३.५४ टक्के होती. जूनमध्ये हा दर ५.०८ होता. २०१९ पासूनची ही सर्वांत मोठी घसरण मानली जात आहे. अर्थशास्त्रांनी महागाईचा अंदाज ३.६५ टक्के ठेवला होता. गेल्यावर्षी जुलै महिन्यात चलनवाढ ७.४४ टक्के होता. हा दर मागच्या १५ महिन्यांपेक्षा उच्च होता. सप्टेंबर २०१९ मध्ये शेवटचा महागाईचा दर ४ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला होता. अन्नधानाच्याकिंमती कमी झाल्याने महागाईचा दर घसरला आहे.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ
किरकोळ चलनवाढीचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या अन्नधान्याच्या किमती गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत ५.४२ टक्के वाढल्या तर जूनमध्ये ९.३६ टक्के वाढल्या होत्या. जुलैमध्ये भाज्यांच्या किमतीत ६.८३ टक्क्यांनी वाढ झाली, जी जून महिन्यात २९.३२ टक्के होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR