न्यूयॉर्क : सलाद हे आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. सलाद जेवणात खाल्ले पाहिजे, असे कायमच डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र, याच सलादमुळे खतरनाक आणि गंभीर आजार पसरत आहे. यामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत यामुळे हजारो लोक गंभीर आजारी झाली आहेत. प्रशासनाकडून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला. रेस्टोरेंट आणि सलाद काऊंटर रिकामी झाली आहेत. रिपोर्टनुसार, सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि रोकथाम केंद्राकडून ७००० प्रकरणे याबाबतची पुढे आल्याची माहिती दिली. हा अमेरिकेतील काही वर्षांमधील सर्वाधिक पसरणारा रोग ठरला. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, अधिका-यांनी मिशिगन, ओहियो, वेस्ट वर्जीनिया आणि केंटकीमध्ये ४०० पेक्षा अधिक लोक सापडली आहेत. रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरियासिस नावाच्या न्या मायक्रोऑरगनिज्स होते. शरीरातील आताड्यांवर हल्ला होतो. सीडीसी रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरा हा एक तर दूषित जेवण किंवा दूषित पाण्यामुळे पसरतो. शेतात खराब पाणी हे त्याचे मुख्य कारण आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, १ ते २ आठवड्यांमध्ये याची लक्षणे दिसून येतात. सुरूवातीला थकवा, शरीरात त्रास जाणवतो. त्यानंतर याचे मुख्य लक्षण म्हणजे डायरिया सुरू होतो.
रूग्णाला पोट फुगण्याची समस्या आणि उल्टी अशा काही समस्या निर्माण होतात. सलादमधून हा गंभीर रोग पसरल्याचे सांगितले जात आहे. सायल्कोस्पोराचे सर्वात घातक म्हणजे या रोगाला शोधणे कठीण आहे. डॉक्टरांनी याबाबत बोलताना म्हटले की, रूग्णाची टायलेट थांबून थांबून येते. ज्यामुळे हा रोग पकडणे टेस्टमध्ये म्हणजे मोठे आव्हान आहे.
अनेक सलाद सेंटर बंद
या रोगाची मोठी धास्ती नागरिकांनी घेतली. लक्षणे दिसण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. हा रोग कळण्यासच मोठा कालावधी लागतो. अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अनेक सलाद सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे यामुळे नाकेनऊ आल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेत या रोगाने हाहाकार माजवला आहे. सतत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.
सलाद आणि परिणाम
– बीटाच्या सेवनाने शरिरात हिमोग्लोबिन वाढतं. बीटाचा वापर सॅलड आणि सँडविचमध्ये केला जातो. काही लोक बीटचा ज्युसदेखील आवडीने पितात. मात्र बीट कच्च खाऊ नये कारण, बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
– पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळर्णाया आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.
– गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढते. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.
– फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.
– टोमॅटोमध्ये आढळणा-या लाईकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. लाईकोपीनमुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि हार्टच्या समस्या दूर राहतात. टोमॅटो शिजवून खाल्ल्याने लाईकोपीन शरीरात जास्त जलद व सहज शोषले जाते.
– बटाट्यांमध्ये आढळणारे स्टार्च बटाटे कच्चे खाल्ल्यास पचण्यास कठीण जाते. म्हणून बटाटे उकडून किंवा शिजवून खावेत.















