27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयबचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांना 'सलाम' : पंतप्रधान मोदी

बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांना ‘सलाम’ : पंतप्रधान मोदी

बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करत आहे

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांची अखेर सुटका झाली आहे. याबाबत अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर लिहले की, उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करत आहे. या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांना मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे.

ते म्हणाले की, या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करतो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत, ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR