नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात कथित घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय सिंग यांना शुक्रवारी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. संजय सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने संजय सिंह यांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कोर्टातून बाहेर पडताना संजय सिंह यांनी मोठा आरोप केला आहे. संजय सिंह म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात गोवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. नुसती अटक नाही तर हे लोक केजरीवाल यांच्यासोबत मोठी घटना घडवणार आहेत. दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.