36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरसराईत गुन्हेगार अजय जाधव येरवड्यात स्थानबध्द

सराईत गुन्हेगार अजय जाधव येरवड्यात स्थानबध्द

सोलापूर : सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील शामा नगर झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगार अजय जाधव यास एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार सदर बझार पोलिसांचे एक पथक जाधव यास घेऊन येरवडा कारागृहाकडे रवाना झाले आहे. अजय रघुनाथ जाधव (वय ४०, रा. शामा नगर झोपडपट्टी, सोलापूर) असे येरवड्यात स्थानबध्द करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. जाधव याच्याविरुध्द गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत.अजय जाधव याच्याविरुध्द मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमविणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, धमकी देणे अशास्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे.

अजय जाधव यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ आणि सन २०२४ मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. तरीही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. त्यामुळे जाधव यास एमपीडीएअंतर्गत कारगृहात स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव सदर बझार पोलिसांकडून पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास पोलिस आयुक्तांनी मंजुरी देत जाधव यास येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉ. दिपाली काळे, विजय कबाडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, अजित लकडे, पोलिस उपनिरीक्षक विशेद्रसिंग बायस, एमपीडीए पथकातील कर्मचारी विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR