डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत चूक

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेत मोठी चूक घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांना घेऊन जाणारे अमेरिकेचे अतिमहत्त्वाचे मरीन वन हेलिकॉप्टर वॉशिंग्टन डीसीच्या आकाशात एका कमर्शियल जेटच्या अत्यंत जवळ आल्याची खळबळजनक घटना घडली. या दोन्ही विमानांमधील अंतर धोक्याच्या पातळीपर्यंत कमी झाल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली असून याप्रकरणी आता फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनने उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे.

मंगळवारी दुपारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेऊन एका मिलिट्री हेलिकॉप्टरने व्हाईट हाऊसजवळून उड्डाण केले. दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या चुकीमुळे उत्तर व्हर्जिनियाच्या रोनाल्ड रीगन नॅशनल एअरपोर्टवरील कमर्शियल उड्डाणे वेळेत रोखता आली नाहीत. याचदरम्यान, फ्लोरिडाच्या दिशेने जाणारे एक पॅसेंजर जेट आणि राष्ट्रपतींचे मरीन वन हेलिकॉप्टर एकमेकांच्या अत्यंत जवळ आले. या लॉस ऑफ सेपरेशन घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात देशाच्या राजधानीत एका कमर्शियल विमान आणि सैन्याच्या ब्लॅक हाक हेलिकॉप्टरमध्ये भीषण टक्कर झाली होती, ज्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर अमेरिकन प्रशासनाने विमान सुरक्षेचे नियम अत्यंत कडक केले होते. नव्या नियमांनुसार, विमानतळांच्या परिसरात विमानांमध्ये किमान १.५ मैल आणि ५०० फूट (व्हर्टिकल) अंतर असणे बंधनकारक आहे. मात्र, या घटनेत हे निश्चित अंतर राखले गेले नसल्याचे समोर आले आहे.

व्हाईट हाऊस आणि एफएएची प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसचे प्रवक्ता कुश देसाई यांनी सांगितले की, मरीन वन हेलिकॉप्टर जगातील सर्वोत्तम आणि अनुभवी पायलट्सद्वारे चालवले जाते. या संपूर्ण प्रवासात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नव्हता. दुसरीकडे, फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ते या सुरक्षेतील त्रुटीची कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात जरी विमान आपांपसात आदळण्याच्या स्थितीत नसले, तरी सुरक्षेच्या दृष्टीने ही एक मोठी चूक मानली जात आहे. या घटनेच्या वेळी आणखी एक तिसरे विमानही परिसराच्या अगदी जवळ आले होते, ज्यामुळे हवाई सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news