सेलू : येथील एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची अटल मॅरेथॉन २०२४ मध्ये निवड झाली असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. याकरिता संपूर्ण देशभरातून अटल मॅरेथॉन ही स्पर्धा सामाजिक अडचणीसाठी तंत्रज्ञान या विषयावर आधारित होती. या स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या वर्ग दहावीतील विद्यार्थी साहिल राठोड, व्हिजन खाडे व पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गॅस लिकेज डिटेक्टर या वर्किंग मॉडेलची भारतभरातून ५०० मॉडेलमध्ये १०६ व्या क्रमांकावर निवड झाली आहे.
संपूर्ण मराठवाड्यातून एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ही एकमेव निवड झालेली शाळा आहे. हे मॉडेल तयार करण्यासाठी डॉ. संजय रोडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना अटल टिंकरिंग लॅब उपलब्ध करून दिलेली आहे. या लॅब मध्येच विद्यार्थ्यांनी गॅस लिकेज डिटेक्टर या मॉडेलची पूर्ण तयारी केली होती. विद्यार्थ्यांनी या मॉडेलसाठी घेतलेल्या मेहनतीचे अतुलनीय यश विद्यार्थ्यांना मिळाले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.