26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रससूनच्या कॅन्टीनमध्ये ड्रग्जची विक्री

ससूनच्या कॅन्टीनमध्ये ड्रग्जची विक्री

पुणे : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील धागेदोरे दिवसेंदिवस उलगडत चालले आहेत. ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर तपास अधिक गतीने होत आहे. अशातच ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाच्या बाबतीत शासनाकडून चौकशी समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर करून पंधरा दिवस होऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत सातत्याने ललित पाटील प्रकरणात आवाज उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले असून जर याबाबत कोणतीही कारवाई नाही झाली तर पोलिस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

तसेच वेळप्रसंगी न्यायालयात देखील जाणार असल्याचे यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात अजूनही तपासात गती मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच मी पोलिस आयुक्त कार्यालयात गेलो होतो आणि तिथे देखील याबाबत पोलिसांशी चर्चा केली. शासन जो काही अहवाल देईल तो देईल.

पण नऊ महिने ससून रुग्णालयात असताना ललित पाटीलने पोलिस, डॉक्टर तसेच हॉस्पिटल प्रशासन यांना जे पैसे दिले होते, त्याची चौकशी करावी. पण पोलिस प्रशासन सरकारच्या दबावाखाली असून कोणताही तपास ससूनच्या बाबतीत करत नाही, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.
तसेच आरोग्य विभागाकडून जी काही चौकशी समिती नेमण्यात आली होती त्याचा अहवाल देखील देण्यात आला असून अद्याप त्यावर देखील काहीच कारवाई करण्यात येत नाही. याचाच अर्थ असा की, शासन तसेच नेमण्यात आलेली समिती ही ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अभय देत असल्याची टीका यावेळी धंगेकर यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR