नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील एका मदरसात चक्क १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शहरातील ताजबाग भागातल्या आशिर्वाद नगराला लागून तावीज नगरातील मदरसात हा प्रकार घडल्याचे समोर आले. अताय रसूल उर्फ तानिफ (२६) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
अताय रसूल उर्फ तानिफ हा मदरसातील मुलांना धार्मिक विधी शिकवत होता. त्यानेच मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षक अताय रसूल सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या मदरसात मुलांवर अत्याचार होत असल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर तक्काळ बीट मार्शलला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मध्य प्रदेशातील एका १६ वर्षीय पीडित मुलाने मदरसा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ (वय २६) असून तो आझाद कॉलनीचा रहिवासी आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगा अरेबिक आणि उर्दू शिकण्यासाठी तोहित नगरमधील गौसिया कॉलनीत असलेल्या मदरसात आला होता. १८ जूनच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास अताय मुलांच्या वसतिगृहात शिरला आणि त्याने झोपलेल्या पीडित मुलाचा विनयभंग केला. मुलाने प्रतिकार केला असता आरोपीने त्याला धमकावले. आरोपीने अशाच प्रकारे जवळच झोपलेल्या दुस-या मुलासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा ही बाब व्यवस्थापकाच्या कानावर आली, तेव्हा त्यांनी अतायची कानउघाडणी केली. मात्र, पोलीस तक्रार होणार असल्याचे समजताच आरोपीने मदरसा सोडून पळ काढला. तपासादरम्यान अशी माहिती समोर आली
















