36.5 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमनोरंजनझी सिने अवॉर्ड्समध्ये शाहरूख चमकला

झी सिने अवॉर्ड्समध्ये शाहरूख चमकला

मुंबई : हॉलिवूडमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला तर रविवारी मुंबईत बॉलिवूडचा महत्वाचा समजला जाणारा २२ वा ‘झी सिने पुरस्कार’ सोहळा पार पडला. झी सिने पुरस्कार २०२४ च्या सोहळ्यात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीनी हजेरी लावली.

या मध्ये यादीत शाहरुख खान, बॉबी देओल, पूजा हेगडे, रणदीप हुड्डा, आयुष्मान खुराना, क्रिती सेनन, सोनू निगम यांच्यासह अनेक स्टार्सचा समावेश आहे. तर, शाहरुख खान या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत मोठा स्टार ठरला. शाहरूखला सर्वोत्तम अभनेत्यासह त्याच्या जवान आणि पठाण या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले.

२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी यशस्वी ठरले होते. किंग खानने जवान, पठाण आणि डंकी सारखे हिट चित्रपट दिले होते. शाहरुख खानला २२ व्या ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये जवान आणि पठाण मधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यासह जवान या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिफएक्स, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट गाणे, अर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन , सर्वोत्कृष्ट संवाद आदी पुरस्कार मिळाले.

झी सिने पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान

सर्वोत्तम व्हिफएक्स – जवान

सर्वोत्तम अ‍ॅक्शन – जवान

सर्वोत्कृष्ट कथा – जवान

सर्वोत्कृष्ट गाणे – जवान

सर्वोत्कृष्ट संवाद – जवान

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजित सिंग (झूम जो पठाण)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका – शिल्पा राव (बेशरम रंग जवान)
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन – मनीष मल्होत्रा ​​(रॉकी और रानी की प्रेम कहानी)
परफॉर्मर ऑफ द इयर मेल- कार्तिक आर्यन (सत्यप्रेम की कथा)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR